satyaupsak

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा भेट, यामागचं नेमकं कारण काय?

Aditya Thackeray Met Devendra Fadnavis: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी फडणवीस भेटीचा सिलसिला सुरुच ठेवला आहे. या भेटीमागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या.

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मुंबईतील विविध समस्या आणि मतदारसंघातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही भेट झाली असल्याचं समजतं. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात आदित्य ठाकरेंची ही तिसरी भेट आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी राज्याच्या आणि मुंबईतील समस्यांसाठी मुख्यमंत्रीपदाच्या अधिकारांकडे वारंवार लक्ष वेधत राहण्याचा निर्धार व्यक्त केला होता. आजच्या भेटीतही त्या धर्तीवर मंत्रालयात आदित्य ठाकरेंची हजेरी होती.

यापूर्वी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली होती.

टोरेस घोटाळ्यावर चर्चा
मुंबईतील चर्चेत असलेल्या टोरेस घोटाळ्याबाबतही आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केल्याचं वृत्त आहे.

सामनातून कौतुक
नुकत्याच दैनिक सामनातून फडणवीसांच्या कामाचं कौतुक झालं होतं. “देवा भाऊ अभिनंदन!” या मथळ्याखाली फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याचं आणि तिथल्या विकासकामाचं कौतुक केलं गेलं. यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाची भूमिका पुन्हा चर्चेत आली होती.

आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
वरळीतल्या पोलीस निवासात राहणाऱ्या निवृत्त पोलिसांच्या समस्यांवर चर्चा करत, प्रति चौरस फुट 150 रुपयांचा दंड कमी करण्याची विनंती आदित्य ठाकरेंनी फडणवीसांकडे केली. मुंबई पोलिसांच्या निवासस्थानांच्या डागडुजीसंदर्भातही चर्चा झाली. याशिवाय सर्वांसाठी पाणी योजना मुंबईत लागू करण्यासाठी मागणी केली.

टोरेस घोटाळ्याबाबत कठोर कारवाईसाठीही फडणवीसांना मागणी केली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *